गणपतीसोबत आता गौरी देखील यायला लागल्या आहेत. गौरी-गणपती निमित्त जागोजागी गौरीच्या आगमनासाठी मोठ्या प्रमाणात जोरदार तयारी सुरु होत झालेली आहे. गौरी आगमनादरम्यान बाजारपेठ देखील खुलून आलेले आहेत. ग्राहकांनी अनेक बाजारपेठा भरलेल्या पाहायला मिळत आहेत. अशातच गौरी-गणपती सणानिमित्त फुल बाजारात देखील ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
गौरी-गणपतीच्या सणाला यवतमाळमध्ये फुलांचे भाव गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांकडून कौडीमोल भावात घेतलेल्या फुलांना बाजारात मात्र हजारांचा भाव पाहायला मिळत आहे. 200 रुपय किलोनं मिळणारी शेवंती आता 800 रुपयांच्या किलोवर पोहचली आहे. तर गुलाबाची 1000ते 1200 प्रतिकिलो, तसेच झेंडूची 250 ते 300 रुपयांना प्रतिकिलो अशी विक्री केली जात आहे. त्यामुळे याचा कमी फायदा सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना होताना दिसत आहे.